आदित्य ठाकरेंनी ‘अशा’ दिल्या मायकल जॅक्‍सन जयंतीच्या शुभेच्छा

मुंबई – जगभरात नावलौकिक मिळवलेल्या किंग ऑफ पॉप आणि डान्सर मायकल जॅक्‍सनच्या 59 व्या जयंती निमित्त युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आपले आजोबा आणि शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे आणि मायकल जॅक्‍सनच्या भेटीचा एक फोटो इन्स्ट्राग्रामवर शेअर केला आहे. त्यांनी स्वतःचाही मायकल जॅक्‍सन सोबत असलेला फोटो शेयर केला आहे. फोटो शेअर करताना इन्स्ट्राग्रामवर आदित्य ठाकरें यांनी मायकल जॅक्‍सन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमच्या सारखा मंचावर गाणारा दुसरा कोणीही बनू शकत नाही, अशी पोस्टही केली आहे.

1996 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आमंत्रणावरून मायकल जॅक्‍सन हा मुंबईत आला होता. मुंबईत पोहोचल्यानंतर मायकल जॅक्‍सनने सर्वप्रथम मातोश्री गाठून शिवसेनाप्रुमुख बाळासाहेब यांची भेट घेतली होती. यावेळी आदित्य ठाकरे फार लहान होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)