आदित्यनाथ यांचा मुस्लिम टोपी घालण्यास नकार

संत कबीरनगर (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संत कबीर दास यांच्या समाधीस्थळी मुस्लिम टोपी घालण्यास नकार दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज झालेल्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आदित्यनाथ आले होते. त्यावेळी या समाधीस्थळाची व्यवस्था पाहणाऱ्या खादिम हुसैन यांनी आदित्यनाथ यांना टोपी देऊ केली होती. मात्र आदित्यनाथ यांनी सविनय त्यास नकार दिला.

परंपरेनुसार आपण मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना टोपी परिधान करण्यासाठी दिली होती. मात्र त्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिल्याचे हुसैन यांनी सांगितले. मात्र मुख्यमंत्र्यांनी ही टोपी आपल्याजवळच ठेवून घेतल्याचेही हुसैन यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2011 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनीही ही गोल टोपी परिधान करण्यास नकार दिला होता. अहमदाबादमध्ये मोदी यांनी सद्‌भावना उपवास केला असता, त्यांना ही गोल टोपी एका धर्मगुरुंनी परिधान करण्यास दिली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)