शिक्रापूर- सध्या सर्व क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. आतापर्यंत महिला सर्व क्षेत्रात लढल्या व दुसऱ्यांसाठी जगल्या. त्यांचे विचार महिलांनी आचरणात आणणे गरजेचे आहे, असे मत शिरूर पंचायत समितीच्या उपसभापती मोनिका हरगुडे यांनी व्यक्त केले. कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे माहेर संस्थेच्या वतीने आयोजित महिला स्वावलंबी प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या महिलांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. 567 महिलांना टेलरिंगचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांनी स्वतः व्यवसाय ही सुरू केला आहे. कार्यक्रमात संस्थेचे प्रकल्प प्रमुख वैभव पवार, वैशाली पाबळे, नमिता मल्लाव, तेजस्विनी पवार, प्रकल्प प्रमुख शर्ली अँथली आदी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा ढेरंगे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)