आदर्श पशुधन पर्यवेक्षक पुरस्काराने डॉ. खेत्रे सन्मानित

कर्जत: येथील डॉ. गजेंद्र खेत्रे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श पशुधन पर्यवेक्षक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. जामखेड तालुक्‍यातील जातेगाव येथील पशुवैदयकीय दवाखान्यात ते कार्यरत आहेत.

पालकमंत्री प्रा. राम शिंदे ,विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांना सपत्निक सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी ज्योती क्रांती पतसंस्थेचे अध्यक्ष आजिनाथ हजारे, संचालक मारूती रोडे, सचिव किरण वर्पे, डॉ. सुधीर ढगे, डॉ. ईश्‍वर हजारे, कांचन खेत्रे, छाया राऊत, महेंद्र खेत्रे, राजेंद्र ढगे, उमेश हजारे, राहुल रोडे उपस्थित होते. क्‍लबचे अध्यक्ष नितीन देशमुख, डॉ. संदीप काळदाते आदिंनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)