आदर्श पर्यावरण संतुलित हौसिंग सोसायटी बक्षिस योजना जाहीर

पिंपरी – शहर हागणदारी मुक्‍त करणे, घनकचऱ्याचे व्यवस्थापन या अभियांनांतर्गत औद्योगिक नगरीला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी पिंपरी – चिचवड महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या “आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षिस योजने’ला सर्वसाधारण सभेने गुरुवारी (दि.20) मान्यता दिली. विजेत्या हौसिंग सोसायट्यांना सामान्य करात रेटींगनुसार सूट देण्यात येणार आहे. शहरी भागातील हौसिंग सोसायट्यांना किमान 25 टक्के तर ग्रामीण भागातील हौसिंग सोसायट्यांना 10 टक्के सवलत दिली जाणार आहे.

शहरातील पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी पिंपरी – चिंचवड महापालिकेने हौसिंग सोसायट्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गत वर्षीपासून सामान्य करात सूट देण्याची बक्षिस योजना जाहिर केली आहे. ही योजना 2017 ते 2020 या तीन वर्ष कालावधीकरिता राबविली जाणार आहे. 12 ते 100 फ्लॅट, बंगलो, रो हाऊस असलेली हौसिंग सोसायटी आणि 100 हून अधिक फ्लॅट, बंगलो, रो हाऊस असलेली हौसिंग सोसायटी अशा दोन गटांसाठी ही स्पर्धा आहे. त्यातही प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयानिहाय एक या प्रमाणे आठ क्षेत्रीय कार्यालयातून आठ सोसायट्यांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या तपासणीसाठी दोन महापालिका अधिकारी, एक अशासकीय संस्थेचा प्रतिनिधी आणि एक पत्रकार यांचे पथक असणार आहे. त्यांनी दिलेल्या “स्टार रेटींग’ गुणांच्या आधारे संबंधित हौसिंग सोसायटीला सामान्य करात सूट देण्यात येणार आहे. बक्षिस योजनेत सहभागी होणाऱ्या सोसायट्यांमुळे कचरा वाहतूक आणि विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका व अन्य शासकीय यंत्रणेवर पडणारा अतिरिक्त ताण काही प्रमाणात कमी होत आहे. “फाईव्ह स्टार’ तीन सोसायट्यांना किमान 15 ते 25 टक्के सामान्य करात सवलत दिली जाणार आहे. मात्र, शहरस्तर वगळून अन्य सोसायट्यांनी हिच कामिगिरी बजावल्यास किमान पाच तर कमाल 10 टक्के सामान्य करात सूट दिली जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने मान्यता दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

असे दिले जातील गुण
मुख्य निकष गुणांक
1) इमारत व परिसरात 100 टक्के कचरा वर्गीकरण, प्रक्रिया 30
2) पाणी संवर्धन, पूनर्चक्रण आणि पेैरवापर 20
3) सौर उर्जा प्रकल्प, एलईडी दिव्यांचा वापर 15
4) वृक्षारोपण व संवर्धन, लॅन्ड स्केपिंग 20
5) पर्यावरणपूरक नाविण्यपूर्ण उपक्रम 15
एकूण                                  100


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)