आदर्श गुणवंत केंद्रप्रमुख पुरस्कार शंकरराव लोखंडे यांना प्रदान

कोरेगाव भीमा- करंदी केंद्राचे केंद्रप्रमुख शंकरराव लोखंडे यांना ‘आदर्श गुणवंत केंद्रप्रमुख पुरस्कार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
करंदी केंद्राचे केंद्रप्रमुख शंकरराव लोखंडे यांना 5 सप्टेंबर या शिक्षकदिनी गुणवंत केंद्रप्रमुख पुरस्कार नुकताच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे अध्यक्ष विश्वास देवकाते हे होते.
शंकरराव लोखंडे यांनी 2011 पासून करंदी केंद्राची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत 100 टक्‍के केंद्र प्रगत, शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात सामील करणे, शाळांची पटसंख्या वाढविणे. तसेच विद्यार्थ्यांची उपस्थित टिकवणे, शिक्षक आणि केंद्रप्रमुख यांचे प्रश्न सोडविणे. याचबरोबर सी.एस.आर. फंडातून आणि लोकसहभागातून अद्यापपर्यंत लाखो रुपयांची कामे, स्वच्छता अभियान, शिक्षण मोहत्सव वृक्षारोपण, शिष्यवृत्ती परीक्षा, वर्गासजावट, मूल्यशिक्षण, ज्ञानरचनावाद इत्यादी उपक्रम केंद्रात राबवले आहेत. केंद्रातील शाळा आदर्श करणे, आपल्या केंद्रात राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे विद्यार्थी आणि शिक्षक यांचे केलेले सक्षमीकरण, केंद्राचा सर्वांगीण विकास, तंत्रस्नेही भूमिका याद्वारे केंद्र एका उंचीवर नेऊन ठेवले आहे, याची दखल घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)