आदर्श गाव होण्यासाठी लोकसहभागाची गरज ः शलाका कोंडे

कापूरहोळ- गावातील तळागळातील नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी गावपातळीवर दरमहा नियमित सभा घेऊन, शासकीय अधिकारी, ग़्रामसेवक आणि नागरिक यांच्यामध्ये योग्य तो समन्वय साधला पाहिजे. सभेत नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, तरच गावच्या विकासाला चालना मिळेल आणि लोकसहभागातून आदर्श गावाची संकल्पना सत्यात उतरेल, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषद सदस्या व शिक्षण समितीच्या सदस्या शलाका कोंडे यांनी केले. शिवसेनेच्या नेत्या आणि आमदार नीलम गोऱ्हे यांनी दत्तक घेतलेल्या साळवडे (ता. भोर) येथे स्मशानभूमी, व्यायाम शाळा आदी विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्‌घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता, यावेळी कोंडे बोलत होत्या. या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे, पंचायत समिती सदस्य पुनम पांगारे, पंचायत समिती भोरचे माजी उपसभापती अमोल पांगारे, शिवसेना समन्वयक नारायण कोंडे, भोर तालुका शिवसेना तालुकाध्यक्ष माऊली शिंदे, सरपंच दीपक भडाळे, उपसरपंच संगीता तांबट, सदस्य संदीप खुळे, निर्मला तांबट, प्रवीण जाध, तुकाराम सणस,ग़्रामसेवक भाऊसाहेब वाघ, केळवडेचे सरपंच बाळासाहेब जायगुडे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)