आदर्श गणेश मंडळ स्पर्धेत कोळवणचे तिरंगा मित्र मंडळ प्रथम

पिरंगुट- मुळशीत गणेशोत्सव दरम्यान कोठेही कायद्याचा भंग न होता गणेश विसर्जन शांततेत पार पडले. नागरिकांना गुन्हा दाखल झाल्यानंतर होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती पटवून सांगण्यात पोलिसांना यश आले. अनेक ठिकाणी गणेशमूर्तीचे विसर्जन कृञिम तलावात करण्यात आले. आबासाहेब शेळके मिञ मंडळाने घेतलेल्या आदर्श गणेश मंडळ स्पर्धा खरंच आदर्श ठरली असून या स्पर्धेमुळे मुळशीत एकही गुन्हा दाखल झाला नाही, असे प्रतिपादन पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी केले.
घोटावडेफाटा (ता. मुळशी) येथील आबासाहेब शेळके मिञ मंडळाच्या वतीने मुळशी तालुका आदर्श गणेश मंडळ स्पर्धा आयोजित केली होती. त्याच्या बक्षीस वितरण सोहळा घोटावडेफाटा येथे पार पडला. यावेळी सुरेश निंबाळकर बोलत होते.
या स्पर्धेचे हे 10 वे वर्ष आहे. यावेळी मुळशीचे तहसीलदार सचिन डोंगरे, निवृत्त उपजिल्हाधिकारी रविंद्र वंजारवाडकर, शिवसेना संपर्कप्रमुख सत्यवान उभे, दिलीप शिंदे, सागर काटकर, सचिन साठे, बाळासाहेब चांदेरे, बाळासाहेब पवळे, बबनराव दगडे, संतोष मोहोळ, स्वाती ढमाले, राम गायकवाड, सचिन खैरे आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार सचिन डोंगरे, रविद्र वंजारवाडकर, सत्यवान उभे, प्रकाश भेगडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश भेगडे, पोपट ववले, विनोद मारणे, शाकीर शेख, सोमनाथ शिंदे यांनी केले होते. प्रास्ताविक आबासाहेब शेळके यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर डफळ यांनी केले. आभार शाकिर शेख यांनी मानले.

स्पर्धेतील विजेते मंडळ पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक – तिरंगा मित्र मंडळ, कोळवण, द्वितीय क्रमांक – बालवीर युवक मंडळ, पिरंगुट कॅंप,
तृतीय क्रमांक – धर्मवीर संभाजी मराठा मंडळ, रिहे.

-Ads-

उत्तेजनार्थ मंडळ : सुवर्ण मित्र मंडळ दारवली, श्री. छत्रपती शिवाजी तरुण मंडळ गावडेवाडी, जय बजरंग तरुण मंडळ मुकाईवाडी, शिवराज कला-क्रिडा मंडळ कुळे, शिवशक्ती तरुण मित्र मंडळ, भुकूम.
विशेष प्राविण्य मंडळ : भैरवनाथ तरुण मंडळ दारवली, श्रीमंत कासारपाटील ट्रस्ट कासारआंबोली, हनुमान तरुण मंडळ पवळेआळी, पिरंगुट.
गुणवंत कार्यकर्ते : चंद्रशेखर रानवडे (नांदे), अक्षय इप्ते (पौड), नंदा सस्ते (पिरंगुट), गौरी गोळे (पिरंगुट), अर्चना सुर्वे (भूगाव).

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)