“आदर्श’च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

कराड – आदर्श विद्यामंदिर विंग येथील 1986-87 च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच पार पडला. या स्नेह मेळाव्यास 31 वर्षानंतरही 64 माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा स्नेहमेळावा परिसरातील सर्वच विद्यार्थ्यांसाठी आदर्श मेळावा ठरला. या मेळाव्यास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस. के. ढवळे, यु. एस. गलांडे, माजी शिक्षक सुर्यवंशी, एस. बी. पाटील, शामराव यादव, वास्के यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

शाळा ही आपल्या जीवनाला आकार देणारी आणि जीवन घडवणारी असते. या शाळेचे ऋण आपण उच्च पदावर गेलो तरी विसरता कामा नये. शाळेचे ऋणनिर्देश जपण्यासाठी आपल्या शाळेला विद्यार्थ्यांकडून काहीतरी दान देणे हे सत्कार्याचे ठरते, असे मत एस. के. ढवळे यांनी व्यक्त केले.

यावेळी बाजिराव यादव, सुर्यवंशी, शामराव यादव यांनी मार्गदर्शन केले. दिवसभर चाललेल्या या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. 31 वर्षांनी भेटलेल्या या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपआपले अनुभव यावेळी सांगितले. या विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला कृतज्ञता निधी म्हणून रोख रक्कम मुख्याध्यापिका एस. के. ढवळे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. विद्यार्थ्यांनी गुणांना महत्व न देता गुणवत्तेला महत्व देऊन शिक्षण घ्यावे. तसेच पालकांच्या अपेक्षांचे ओझे न बाळगता आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जाऊन आपले भवितव्य यशस्वी करावे, असे मत यावेळी सुनिल परीट यांनी व्यक्त केले.

यावेळी दिलीप यादव, वसंत खबाले, राजेंद्र खबाले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निळकंठ खबाले, विलास खबाले यांच्यासह माजी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. यु. एस. गलांडे यांनी प्रास्ताविक केले. एस. एस. यादव यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)