“आत्मा मालिक’ला “जनरल चॅम्पीयनशीप’

????????????????????????????????????

संजीवनी महोत्सव; सलग दुसऱ्या वर्षी मिळाले यश
कोपरगाव – संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था आयोजित “संजीवनी महोत्सवा’मध्ये आत्मा मालिक माध्यमिक गुरूकूलने स्पर्धेत सर्वाधिक पदके प्राप्त करून “जनरल चॅम्पीयनशीप’ मिळविली. सलग दुसऱ्या वर्षी “आत्मा मालीक’ ला हे यश मिळाले. मुंबई विभागीय निरीक्षक अनिल गुंजाळ व संजीवनी शिक्षण संस्थेचे कार्यकारी विश्‍वस्त अमित कोल्हे यांच्या हस्ते 11 हजार रुपये रोख, चषक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या विविध विभागांनी उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेत आपला ठसा उमटविला. यामध्ये माध्यमिक गुरूकुलने व्हॉलीबॉल, विज्ञान प्रदर्शन व नृत्य यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. गणित प्रदर्शन व चित्रकलेमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. इंग्लिश मीडियम गुरूकूलने समूह चर्चा प्रथम क्रमांक, तर व्हॉलीबॉल व कबड्डीमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलने ऑनलाईन गेममध्ये प्रथम क्रमांक आणि सामान्यज्ञान व बास्केटबॉलमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला.
प्रथम व द्वितीय क्रमांकासाठी अनुक्रमे 3001, 2001 रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप होते. या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, माणिक जाधव, कांतिलाल पटेल, नामदेव डांगे, विभागप्रमुख रमेश कालेकर, नितीन सोनवणे, सागर आहिरे, सचिन डांगे, मीना नरवडे, अनिल सोनवणे, बाळासाहेब कराळे, रवींद्र देठे आदींचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे संत देवानंद महाराज, संत परमानंद महाराज, संत निजानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्‍वस्त प्रकाश भट, वसंतराव आव्हाड, प्रभाकर जमधडे, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, व्यवस्थापक हिरामण कोल्हे आदींनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)