आत्मा मालिकच्या खेळाडूंची स्पर्धेसाठी निवड

कोपरगाव: राज्य सरकारचा क्रीडा व युवक सेवा संचलनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र स्पीडबॉल असोसिएशन, कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय स्पीडबॉल स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत आत्मा मालिकच्या पाच खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या स्पर्धेत कोल्हापूर, पुणे, नाशिक, मुंबई, लातूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या आठ विभागांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेतून 64 व्या राष्ट्रीय शालेय स्पीडबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यात आला. महाराष्ट्र राज्य संघात आत्मा मालिक रेसिडेन्शिअल स्पोर्टस ऍकॅडमीचे ज्युनिअर कॉलेज विभागातील 19 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये तेजस गवळी, प्रशांत सांगळे यांची निवड झाली. तसेच ओमगुरूदेव इंग्लिश मीडियम आत्मरूप विभागाची 19 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघात कांती राऊत हिची निवड झाली. रेग्युलर सेमी विभागातील 17 वर्षे वयोगट मुलांमध्ये अभिषेक कातकडे व 17 वर्षे मुलींमध्ये मराठी मीडियम विभागातील समीक्षा दवेची निवड झाली. पालमपूर (हिमाचलप्रदेश) येथील राष्ट्रीय स्पर्धेत ते सहभागी होणार आहेत. या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक पद्मराज गायके, गणेश म्हस्के, अण्णा गोपाळ यांचे मार्गदर्शन लाभले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निवड झालेल्या खेळाडूंचे आत्मा मालिक माऊली, सकल संत परिवार, अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्‍वस्त प्रकाश भट, वसंतराव आव्हाड, प्रभाकर जमधडे, बाळासाहेब गोर्डे, जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, क्रीडा अधिकारी नंदकिशोर रासने, महाराष्ट्र स्पीडबॉल असोसिएशनचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, सचिव ज्ञानेश काळे, सर्व विभागाचे प्राचार्य, आत्मा मालिक स्पोर्टस ऍकॅडमीचे क्रीडा संचालक अशोक कांगणे, अजित पवार, सर्व क्रीडा शिक्षक आदींनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)