आत्मा मालिकचे खो-खो स्पर्धेत वर्चस्व

कोपरगाव – जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित शालेय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाने घवघवीत यश संपादन करत खो-खो खेळातील दबदबा कायम राखला. स्पर्धेत 14 वर्षांखालील मुले व मुली या दोन्हीही गटात ओम गुरुदेव इंग्लिश मीडियमच्या संघांनी प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळविला. तसेच, 17 व 19 वर्षांखालील मुलांच्या गटात ओम गुरुदेव माध्यमिक गुरुकुलने सरस खेळ करत प्रथम क्रमांक मिळविला.

त्याचप्रमाणे 14 वर्षे मुलांच्या गटात ओम गुरुदेव माध्यमिक गुरुकुलने व 17 वर्षे मुलांच्या गटात ओम गुरुदेव इंग्लिश मीडियम गुरुकुलने द्वितीय क्रमांक मिळविला. या स्पर्धा नुकत्याच तालुका क्रीडासंकुल, कोपरगाव येथे पार पडल्या.

सर्व खेळाडूंना आश्रमाचे क्रीडा प्रशिक्षक अशोक कांगणे, अजित पवार, सुरेश शिंदे, खो-खो प्रशिक्षक भाऊ पवार, रवींद्र नेंद्रे, गणेश म्हस्के, धनंजय दातीर, रणजित लेंभे, विजया झनान यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे आश्रमाचे संत देवानंद महाराज, संत परमानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्‍वस्त वसंतराव आव्हाड, प्रभाकर जमधडे, माधवराव देशमुख, प्रकाश भट, बाळासाहेब गोरडे, प्रकाश गिरमे, प्राचार्य निरंजन डांगे, सुधाकर मलिक, माणिक जाधव, विभागप्रमुख नितीन सोनवणे, सचिन घुंगुर्डे, नामदेव डांगे, आदींनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)