आत्महत्येस प्रवृत्ती केल्या प्रकरणी दोन बहिणींवर गुन्हा दाखल

तळेगाव दाभाडे – प्रेयसी व तिच्या बहिणीने लग्नाचा तगादा लावून शारीरिक व मानसिक छळ केल्याने प्रियकराने राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून घटना उघडकीस आली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी (दि. 25) दाखल करण्यात आला. आरोपींना अद्यापही अटक नाही.

प्रणव महादेव गरुड (वय 21, रा. शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे ता.मावळ) असे आत्महत्या केलेल्या प्रियकराचे नाव आहे. आपुलकी विलास आगळे व तिची बहिण (दोघी रा. शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे ता. मावळ) असे आरोपींची नावे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रणव गरुड यांचे आपुलकी आगळे हिच्या सोबत प्रेमसंबंध होते. आपुलकी व तिची बहिण प्रणव याला वारंवार आपुलकी हिच्यासोबत विवाहासाठी तगादा लावत होती. या दोघी बहिणी प्रवण याचा शारीरिक व मानसिक छळ करत असल्याने आलेल्या नैराश्‍यातून 26 मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रणव याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपुलकी व तिची बहिण वारंवार आपुलकी हिच्यासोबत लग्न करण्यासाठी तगादा लावत होते. या सततच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा आपुलकी व तिच्या बहिणीवर दाखल केला आहे. आरोपींना अद्यापही अटक नाही. पोलीस हवालदार बंडू तात्या मारणे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)