आत्मसर्पण केलेल्या नक्षलीची छत्तीसगडमध्ये गळा चिरून हत्या

दंतेवाडी (छत्तीसगड) – आत्मसर्पण केलेल्या एका नक्षलीची छत्तीसगडमध्ये गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. नक्षली पोदिया उर्फ गांधी बड्डे याचा मृतदेह पोलीसांना दंतेवाडाच्या चौलनार मार्गावर मिळाला. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास चालू आहे.

नक्षली पोदिया उर्फ गांधी बड्डे याने चार दिवसांपूर्वीच छत्तीसगड पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले होते. त्या वेळी दंतेवाडा पोलीस सुपरीटेंडेंटनी पोदियाला 10,000 हजार रुपयांचे इनाम दिले होते. पोदियाने काही दिवस आपल्य गावी जाऊ नये, असा योग्य सल्लाही पोलीसांनी त्याला दिला होता. तरीही गावातील उत्सवासाठी पोदिया गावी गेला आणि त्याच्या जुन्या साथीदारांनी मंगळवारी रात्री त्याची गळा चिरून हत्या केली.

याच वर्षी 20 मे रोजी दंतेवाडाच्या मदाडी येथे नक्षलींनी केलेल्या स्फोटात 7 पोलीसकर्मी मारले गेले होते. हा स्फोट करणारांमध्ये पोदियाचाही समावेश होता. 26 ऑगस्ट रोजी पोदियाने पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)