आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या नऊ मराठा आंदोलकांना सोडून देण्याचा आदेश

पुणे बार असो. केलेल्या अपीलवर सुनावणी करताना सत्र न्यायालयाने दिला निर्णय


प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी केली होती आंदोलकांची  न्यायालयीन कोठडीत रवानगी

पुणे – मराठा आरक्षण आंदोलनात आत्महत्या केलेल्या तरूणांच्या कुटुबियांना 50 लाखांची नुकसान भरपाई द्यावी, मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून किंवा आत्मदहन करून आयुष्य संपवण्याचा इशार दिल्याप्रकरणात अटक केलेल्या नऊ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी केलेला आदेश सत्र न्यायालयाने रद्द केला. त्या नऊ जणांची सुटका करण्याचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी दिला आहे.
सतिश भास्कर काळे (40, रा. कन्हैया पार्क, थेरगाव), धनाजी मधुकर येळकर (36, कैलासनगर, थेरगाव), ज्ञानदेव व्यकटराव लोभे (29, रा. गुजरनगर, थेरगाव), राजेंद्र बापु देवकर (39, रा. दगडोबा चौक, चिंचवड), अमोल माधवराव मानकर (27,रा. काळेवाडी), अंतिम सुभाष जाधव (25, रा. वेणूनगर, वाकड), राजू दत्तात्रय पवार (35, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), वैभव सुर्यकांत जाधव (40, काटेनगर, पिंपळे सौदागर) आणि भैयासाहेब बाबासाहेब गजधने (26, रा. रहाटणी ) अशी सुटका केलेल्या नऊ आंदोलकांची नावे आहेत. या प्रकरणात नऊ जणांना वाकड पोलिसांनी अटक केली होती. त्यांना स्थानबध्दतेसाठी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला होता. या आदेशाच्या विरोधात पुणे जिल्हा बार असोसिएशनने सत्र न्यायालयात अपील केले. अध्यक्ष ऍड. सुभाष पवार, उपाध्यक्ष ऍड. रेखा करंडे, ऍड. समीर घाटगे, ऍड. विजय शिंदे, ऍड. विवेक भरगुडे, ऍड. योगेश पवार, ऍड. हेमंत झंजाड आणि ऍड. विश्‍वजित पाटील यांनी हे अपील केले होते. यावर सुनावणी करत नऊही जणांना सोडून देण्याचे आदेश न्यायालयाने दिला.

What is your reaction?
24 :thumbsup:
4 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)