आता होणार 100 चेंडूंचा सामना

 आयसीसीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल

लंडन – क्रिकेटच्या छोट्या टी-20 फॉरमॅटने सध्या जगातील कानाकोपऱ्यातील चाहत्यांना वेड लावले आहे. त्यामुळे काही शतकांचा वारसा लाभलेल्या कसोटी, वनडेपेक्षाही या छोट्या फॉरमॅटला अल्पवाधीमध्ये मोठी प्रसिद्ध मिळाली. जगभरातील कोट्यवधी चाहत्यांची टी-20 क्रिकेटच पहिली पसंती आहे.

त्यातच नवीन चाहत्यांना क्रिकेटकडे आकर्षित करणे, क्रिकेटचा प्रसार मोठ्या प्रमाणावर करणे, क्रिकेटमध्ये नावीन्य आणण्या साठी आता आता इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने क्रिकेटच्या विश्वात नव्या स्वरूपाचा फॉर्म्युला वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

यातूनच आता लवकरच 100 चेंडूंच्या सामन्यांचे आयोजन केले जाईल. या प्रयोग ईसीबीच्या वतीने 2020 मध्ये राबवण्याचा प्रयत्न आहे. यासाठीचा प्रस्ताव नुकताच ईसीबीच्या वतीने तयार करण्यात आला. आयसीसीच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव दाखल होईल. 2020 मधील स्पर्धेदरम्यान 38 दिवसांत एकूण 36 सामने आयोजित करण्याचा ईसीबीचा मानस आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आज देशांतर्गत क्रिकेटमध्ये 100 चेंडूंच्या सामन्याच्या प्रस्ताव ठेवला आहे. याची सुरुवात 2020 मध्ये होणार असून यात महिला व पुरुषांचे 8 संघ त्यांच्या गटातून खेळणार आहेत. यासाठी संघांचीही निवड केली जाईल. या स्पर्धेत 100 चेंडू एका डावात टाकले जाणार आहेत.

यामुळे तरुण चाहते या स्पर्धेला लाभतील, असे आजच्या बैठकीत सांगण्यात आले. यामुळे क्रिकेटची प्रसार व्हायलाही उपयोग होईल. नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या 100 चेंडूंच्या सामन्याचे स्वरूपही जरा हटकेच आहे. यामध्ये डावातील पहिली 15 षटके पारंपरिक पद्धतीने टाकली जाणार. म्हणजे एका ओव्हरमध्ये सहा चेंडू टाकले जातील. त्यानंतर शेवटच्या म्हणजेच 16 व्या षटकात गोलंदाजाला 10 चेंडू टाकावे लागणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)