आता हॉरर चित्रपटात झळकणार कतरिना?

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफचा बीग बजेट असलेला आगामी “भारत’ चित्रपटाची तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागती आहे. या चित्रपटाची शुटिंग सुरू झाल्यापासूनच सलमान खान-कतरिना कैफ ही जोडी चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करत असून यापूर्वी कतरिनाने त्यांच्यासोबत “मेरे ब्रदर की दुल्हन’ आणि “टायगर जिंदा है’ आदी चित्रपटात काम केले आहे.

कतरिनाला एका कार्यक्रमावेळी मुलाखतीत तिने कोणत्या प्रकारच्या चित्रपटात अद्याप काम केले नाही असा प्रश्‍न विचारण्यात आला. याला उत्तर देताना ती म्हणाली, मी आतापर्यत हॉरर चित्रपटात काम केलेले नाही. याच प्रश्‍नावर अली अब्बास जफर म्हणाले की, त्यांनी कतरिनासाठी एका हॉरर चित्रपटाचे कथानक लिहिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, त्यांनी चित्रपटाबाबत अधिक माहिती देण्याचे टाळले. त्यामुळे आता कतरिना लवकरच हॉरर चित्रपटात झळकण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, मल्टी-स्टारर “भारत’ चित्रपटात सलमान-कतरिनाशिवाय तब्बू, दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ आणि सुनील ग्रोवर आदी कलाकार निर्णायक भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून त्याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. “भारत’ चित्रपट जून महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)