आता सीबीआय अधिकारी सिन्हांचेही बदलीला आव्हान 

नवी दिल्ली: सीबीआयचे अधिकारी राकेश आस्थाना यांच्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करणारे आणखी एक सीबीआय अधिकारी मनिषकुमार सिन्हा यांनीही आपल्या बदलीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सरकारने त्यांची नागपुरला बदली केली आहे. या याचिकेवर त्वरीत सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी सरन्यायाधिश गोगोई यांच्या खंडपीठापुढे केली आहे.

सीबीआयचे प्रमुख अलोक वर्मा यांच्याही याचिकेवर उद्याच याच खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. त्याचवेळी आपल्याही याचिकेवर सुनावणी व्हावी अशी सिन्हा यांची मागणी आहे. राकेश अस्थाना यांची आपण चौकशी करू नये म्हणूनच आपली नागपुरला बदली करण्यात आल्याची त्यांची तक्रार आहे. आस्थाना यांनी मांस निर्यातदार मोईनुद्दीन कुरेशी याच्याकडून मोठी लाच घेतल्याचा आरोप आहे. आणि आस्थाना हे मोदींशी जवळीक असलेले अधिकारी म्हणून ओळखले जातात.

-Ads-

काही कोटी रुपये मंत्र्यांना दिले गेले 

राकेश अस्थाना यांच्या प्रकरणात पुरेसे पुरावे आहेत. त्या पुराव्यांशी छेडछाड केली जात आहे. आपण करत असलेल्या चौकशीमध्ये सरकारकडून वारंवार अडथळा आणला जात आहे. सीबीआयच्या रडारवर असलेल्या एका उद्योजकाच्यावतीने एका केंद्रीय राज्यमंत्र्याला काही कोटी रुपयांची लाच देण्यात आली आहे, असा आरोपही सिन्हा यांनी आपल्या याचिकेत केला आहे.

विधी सचिव सुरेश चंद्रा आणि अन्य प्रशासकीय अधिकारी रेखा रानी यांच्या नावांचा सिन्हा यांनी आपल्या याचिकेमध्ये उल्लेख केला आहे. नीरव मोदीच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी लंडनमध्ये गेलो असताना मोईन कुरेशी प्रकरणातील सतिश सना याची भेट झाल्याचे चंद्रा यांनी म्हटले होते. भारत सरकारकडून पूर्ण संरक्षण दिले जाईल, असे सना याला आश्‍वासन देण्याचा प्रयत्न चंद्रा यांनी केला होता, असा दावा सिन्हा यांनी आपल्या याचिकेमध्ये केला आहे.

मात्र चंद्रा यांनी मात्र आपण सतिश सना याला ओळखतच नसल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. मुख्य दक्षता आयुक्‍त के.व्ही. चौधरी यांनी राकेश अस्थाना यांची जुजबी चौकशी केली आणि त्यांच्याविरोधातील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्याबाबत अधिक बोलणे उचित होणार नसल्याचेही सिन्हा म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)