आता “सीएनजी’ महागला; आजपासून नवे दर लागू

3 रुपयांनी भाववाढ : नियोजन कोलमडणार

पुणे – सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे कंबरडे मोडले असतानाच आता आणखी झटका बसला आहे. पेट्रोल-डीझेलच्या तुलनेत फायदेशीर असलेल्या सीएनजी म्हणजेच कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आणि पीएनजी अर्थात घरगुती वापराच्या गॅसचे दरही आजपासून वाढणार आहेत. सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) आजपासून शहरातील सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आणि पीएनजी अर्थात घरगुती वापरासाठी असलेला पाइप नॅचरल गॅस या दोन्हींच्या दरात 3 रुपयांनी वाढ केली आहे. आजवर शहर हद्दीत सीएनजी गॅस 52 रुपये तर घरगुती वापरासाठीच्या पीएनजी गॅसची किंमत 26 रुपये होते. यात प्रत्येकी तीन रुपये वाढ झाली असून सीएनजी आणि घरगुती वापरासाठी असलेल्या पीएनजीची किंमत अनुक्रमे 52 आणि 29 रुपये झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून अधिकचा भार सोसावा लागत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)