आता सिंगापूरमध्येही…मराठमोळ्या बबनची रसिकांना भुरळ

सलग चौथ्या आठवड्यातदेखील महाराष्ट्रात हाऊसफुल ठरत असलेल्या ‘बबन’ चित्रपटाने थेट सिंगापूरमधील सिनेरसिकांना भुरळ घातली आहे.

सिंगापूरच्या मराठी सिनेरसिकांनादेखील या सिनेमाचे आस्वाद घेता यावा, यासाठी तेथील स्थानिक प्रेक्षकांकडून ‘बबन’च्या या खास स्क्रीनिंगची मागणी करण्यात आली. त्यानुसार सिंगापूरमधील मराठी प्रेक्षकांसाठी ‘बबन’ची ही भलीमोठी स्क्रिनिंग आयोजित केली जात आहे.

ग्रामीण जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमात भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव यांची प्रमुख भूमिका आहे. ‘बबन’ सिनेमातील संवाद आणि गाण्यांनादेखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभत असून, हा सिनेमा मनोरंजनाबरोबरच सामाजिकतेचे भान जपण्याचे धडे प्रेक्षकांना देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)