आता संघर्षाची व्याख्या बदलावी लागेल

बारामती- यश हे सगळीकडेच मिळते मात्र, त्यासाठी मनातून प्रयत्न झाले पाहिजेत. आज देशातील सर्व क्षेत्रे अस्थिर स्वरुपात आहेत. प्रचंड गर्दी वाढलेली आहे. त्यामुळे अगदी सुरुवातीपासून रस्ता शोधावा लागतो आहे. परिवर्तनाची देखील सुरुवात झाली आहे मात्र, ती संथ गतीने होत आहे. लोकलमध्ये आभ्यास करुनसुद्धा अधिकारी बनलेले पाहिलेले आहेत. कष्ट दिसले की, प्रतिसादही मिळत राहतो. अभ्यास हे बैठक व साधना यांच्यातून झाला पाहिजे. आता संघर्षाची व्याख्या बदलावी लागेल, असे प्रतिपादन युनिक ऍकॅडमीचे स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ मार्गदर्शक मनोहर भोळे यांनी केले.
विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय आणि युनिक ऍकॅडमी यांच्या संयुक्‍त विद्यमाने “अभ्यास ते अधिकारी’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमात भोळे बोलत होते. यावेळी महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्व्यक डॉ. सुनिल ओगले, डॉ. आनंदा गांगुडे, डॉ. श्रीराम गडकर, वसंत घुले आदि मान्यवर उपस्थित होते.
मनोहर भोळे म्हणाले की, बसायला जागा, वाचायला पुस्तके, योग्य मार्गदर्शन, मनापासून अभ्यासाची तयारी या चतु:सूत्रीचा वापर केल्यास यश आपल्याच हातात आहे. नक्षलवादी भागातसुद्धा 600 ते 650 मुले मार्गदर्शनासाठी प्रयत्न करतात ही जमेची बाजू आहे. स्पर्धा परीक्षेत भावनेला शून्य किंमत असावी मात्र, वास्तवतेला महत्त्व दिले पाहिजे. जोपर्यंत सिद्ध करता येत नाही, तोपर्यंत वेडे होऊन अभ्यास करावा लागतो. अभ्यास ही एक संकल्पना आहे. सध्याची स्पर्धा परीक्षांची परिस्थिती पाहता जो प्रामाणिकपणे अभ्यास करतो त्याला निश्‍चित न्याय मिळतो. एका अभ्यासातील लक्ष वेधले जाते की, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या साडेतीनशे विद्यार्थ्यांपैकी फक्‍त 20 विद्यार्थी योग्य पद्धतीने अभ्यास करतात. साधनांची उपलब्धता, मागच्या पाच वर्षांच्या प्रश्‍नपत्रिकांचे विश्‍लेषण सर्वसाधारण व सुक्ष्म या दोन्ही बाजूंनी समजावून घेण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ. श्रीराम गडकर यांनी आभार मानले.

  • … तर आपले यश नक्की
    दररोज 100 ते 150 प्रश्‍न हे सोडविलेच पाहिजेत. एका प्रश्‍नाचे उत्तरे चार वाटल्यास आपला अभ्यास नाही असे समजावे, दोन वाटल्यास आपण अर्ध्या रस्त्यावर आहोत, तर एक बरोबर वाटल्यास आपले यश नक्की आहे, असे समजावे. स्वत:च्या चूका शोधायच्या व त्या दुरुस्त करायच्या आणि तणावमुक्‍त अभ्यास करायचा असे, मनोहर भोळे यांनी नमूद केले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)