आता श्रीसंतलाही करायची आहे अॅक्‍टिंग

बिग बॉस च्या सीझन 12 नंतर श्रीसंत एकदम फॉर्मात आला आहे. क्रिकेटचे मैदान सोडून तो सेलिब्रिटी व्हायला एकदम तयार झाला आहे. “बिग बॉस’च्या फायनलपर्यंत पोहोचेपर्यंत त्याने सेलिब्रिटी होण्याचे शिक्षण व्यवस्थित पूर्ण केले असून आता तो लवकरच बॉलीवूडमध्ये उतरणार आहे. तो दुसरे तिसरे कोणी नाही, तर ऋचा चढ्ढाच्या बरोबर बॉलीवूडमध्ये येणार आहे, असे समजते आहे. त्याच्या सिनेमाचे नाव “कॅब्रे’ असणार आहे.

“कॅब्रे’ हा सिनेमा त्याच्या वाट्याला तीन वर्षांपूर्वीच आला होता, पण निर्मात्यांमधील वादामुळे तो रखडला होता. “ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर आता तो रिलीज होतो आहे. “ओटीटी’ या डिजीटल प्लॅटफॉर्मने या सिनेमाची निर्माती पूजा भटलाही पुन्हा सक्रिय केले. “कॅब्रे’चे प्रॉडक्‍शन पूजा भट करते आहे.

क्रिकेटपासून अंतर घेतल्यानंतर श्रीसंतने आपला मार्गच एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीकडे वळवला. रिऍलिटी शो मधून सुरुवात झाली. या एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीशी त्याचे नाते तसे जुने आहे. त्याची बहिण अॅक्‍टर आहे. तर मेव्हणा गायक आहे. त्याची भाची देखील सिनेमामध्ये पदार्पण करते आहे. त्याच्याशिवाय कुटुंबातील सर्वचजण कोणत्या ना कोणत्या अर्थाने फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेले असल्याचा त्याला फायदाच आहे. “कॅब्रे’ च्या रिलीजला उशीर झाला असला, तरी श्रीसंतसाठी हा रिलीज योग्य वेळीच होतो आहे. आता सिनेसृष्टीतील अॅक्‍टिंगच्या करिअरसाठी योग्य पार्श्‍वभूमी तयार झाल्याने पुढील प्रवास सोपा झाला आहे, असे त्याला वाटते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)