आता शेतक-यांच्या विहिरीतल्या पाण्यावरही टॅक्‍स

खासदार अशोक चव्हाण : मोदी- फडणवीसांच्या भाषणावरही लावा टॅक्‍स
कोल्हापूर – स्वतंत्र भारताच्या इतिहासात शेतक-यांना शेतीसाठी लागणा-या ट्रॅक्‍टरवरच्या सुट्या भागांवर आणि इतर शेती औजारांवर जीएसटी लावणा-या या सरकारने आता शेतक-यांच्या विहिरीतल्या पाण्यावर टॅक्‍स लावला आहे. खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करणा-या मोदी फडणवीसांच्या भाषणांवरही टॅक्‍स लावला पाहिजे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

कॉंग्रेस पक्षाची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा आज दुस-या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक येथे पोहोचली. सांगली फाटा येथे भव्य दुचाकी रॅलीने या यात्रेचे स्वागत केले. त्यानंतर चोकाक येथे आयोजीत सभेत अशोक चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कलाप्पा आवाडे, बसवराज पाटील, डी. पी. सावंत, चारुलता टोकस, विलास औताडे, सचिन सावंत, डॉ. राजू वाघमारे यांच्यासह कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशोक चव्हाण म्हणाले की, कॉंग्रेस सरकारच्या काळात विकासात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राची भाजप शिवसेना सरकारने अधोगती केली आहे. शेतीमालाला भाव नाही. कर्जमाफी मिळाली नाही. शेतक-यांना पीक कर्ज मिळत नाही. नुकसानीची मदत मिळत नाही. जनतेला मदत करण्याऐवजी सरकार इंधनावर कर लावून सर्वसामान्यांची लूट करित आहे.

नोटाबंदी आणि जीएसटीमुळे या भागातील पॉवरलूम व्यवसाय अडचणीत आला आहे. हजारो लोकांचा रोजगार बुडाला आहे. भाजप-शिवसेना सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वच घटक अडचणीत आले आहेत. राज्यावर पाच लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर करून ठेवला आहे. भाजप-शिवसेनेला जनतेच्या प्रश्नांची जाणच नाही. त्यामुळे ते प्रश्न सोडवू शकत नाहीत. त्यासाठीच हा जनसंघर्ष सुरु असून भाजप-शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

आमदार सतेज पाटील म्हणाले, जनसंघर्ष यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहिल्यावर आता परिवर्तन होणार यात काही शंका नाही. या परिवर्तनामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोल्हापूर जिल्ह्याचा राहील. कॉंग्रेस पक्षाचे सर्वात जास्त आमदार कोल्हापूर जिल्हा निवडून देईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)