आता व्हॉट्‌ऍपवरून करा ‘मनी ट्रान्स्फर’

“नॅशनल पेमेंट्‌स कॉरपोरेशन ऑफ इंडिया’ने (एनपीसीआय) व्हॉट्‌सऍपला आता “मनी ट्रान्सफर सर्व्हिस’साठी मंजुरी दिली आहे. याद्वारे कोणत्याही खात्यातील धारकांना “युनिफाइड पेमेंट इंटरफेस’मध्ये (यूपीआय) पैसे ट्रान्सफर करता येतील. हा पहिला मोबाइल ऍप असणार आहे जो डिजिटल पेमेंटसाठी मल्टी बॅंक पार्टनरशिपसोबत काम करणार आहे.
जूनमध्ये इंस्टंट पेमेंट सर्विस सुरू करण्यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि एनपीसीआयसारखी वित्तीय संस्थांशी व्हॉट्‌सऍपने बोलणी केली. व्हॉट्‌सऍपच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ज्याप्रमाणे इंस्टंट मेसेज डिलिव्हरी होते त्याचप्रमाणे दोन खाताधारकांमध्ये पैसे ट्रान्सफर करता येणे शक्‍य होणार आहे.

व्हॉट्‌सऍप भारतामध्ये सर्वांत जास्त लोकप्रिय आहे आणि 20 कोटी पेक्षाही जास्त युजर्स आहेत त्यामुळे या ऍपचा फायदा कंपनीला चांगला होणार आहे.लवकरच गुगलही बॅंकेबरोबर पार्टनरशिप करून पेमेंट सर्विस सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी गुगलला आरबीआयकडून मान्यता मिळणे बाकी आहे. 2016 मध्ये आरबीआयचे पूर्व गव्हर्नर रघुराम राजन यांनी यूपीआई सर्विसची सुरूवात केली होती. यामुळे मोबाइल युजर्स या पद्धतीचा वापर करुन दोन बॅंका दरम्यान निधी ट्रान्सफर करू शकतो.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)