आता विद्यार्थ्यांना ‘कॉपी’ अशक्‍यच!

संग्रहित छायाचित्र

प्रश्‍नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिकेवर भर : इंग्रजी व गणित विषयासाठी एक प्रश्‍नपत्रिका

पुणे – यंदा दहावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. त्यात प्रश्‍नपत्रिका ऐवजी कृतिपत्रिकेवर भर देण्यात आला आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना परीक्षेत कॉपी करणे शक्‍यच नाही. त्यामुळे येत्या दहावी लेखी परीक्षेला इंग्रजी व गणित या विषयाची बहुसंच प्रश्‍नपत्रिका न देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. इंग्रजी व गणित विषयासाठी आता एकच प्रश्‍नपत्रिका राहणार असल्याचा निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक वर्गातून होत आहे.

-Ads-

कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी बहुसंच प्रश्नपत्रिका पद्धत सुरू करण्यात आली. त्यात इंग्रजी आणि गणित या विषयांसाठी अ, ब, क आणि ड असे प्रश्नसंच असायचे. मात्र, यंदा दहावीचा अभ्यासक्रम बदलल्यामुळे गणित आणि इंग्रजी या दोन्ही विषयांसाठी एकच प्रश्नपत्रिका (कृतिपत्रिका) असेल. दहावीचा बदललेला अभ्यासक्रम कृतिशील आणि विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारा आहे. परीक्षेत कॉपी होणे शक्‍य नसल्याचे स्पष्ट करत राज्य मंडळाने बहुसंच प्रश्नपत्रिकांची पद्धत बंद करून अभ्यासक्रमातील ज्ञानरचनावाद परीक्षेतही आणण्यासाठी महत्त्वपूर्ण बदल केला. केवळ जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुसंची प्रश्नपत्रिका पद्धत लागू असेल, असे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

अभ्यास मंडळ सदस्यांच्या अभिप्रायानंतर हा बदल करण्यात आला असून, त्यात बदललेल्या अभ्यासक्रमांत विद्यार्थ्यांच्या आकलनावर भर आहे. कृतिपत्रिका सोडवाव्या लागणार आहेत. परीक्षेत पाठांतरावर आधारित प्रश्नच विचारले जाणार नसल्याने प्रश्नांची पुनरावृत्ती होणार नाही, असेही बोर्डाने कळविले आहे.

दरम्यान, कॉपीचा प्रकार रोखण्यासाठी बहुसंच प्रश्‍नपत्रिका पद्धत होती. आता मात्र कृतिपत्रिकेत सर्व प्रश्‍न आकलनावर आहेत. त्यात एकमेकांची कॉपी करता येणे शक्‍यच नाही. त्यामुळे इंग्रजी व गणित या दोन्ही विषयाची प्रत्येकी एकच प्रश्‍नपत्रिका आता दिले जाणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बोर्डाने घेतलेला निर्णय योग्य असून, स्वागतार्ह आहे, असे पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्‍चंद्र गायकवाड यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)