आता रेल्वेच्या मालमत्तांवर ‘उपग्रहांद्वारे’ ठेवली जाणार नजर

नवी दिल्ली : रेल्वेचे भूखंड आणि स्थानका जवळ अतिक्रमण करणे आता अवघड होणार आहे. कारण रेल्वेच्या मालमत्तांची देखरेख आता उपग्रहाद्वारे ठेवली जाणार आहे. यासाठी रेल्वे आणि इस्रोदरम्यान करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी रेल्वेने सर्व विभागांना मालमत्तांचा तपशील जमा करण्याचे  आदेश देखील दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रत्येक विभागात एक नियंत्रण कक्ष स्थापन केला जाणार आहे. या कक्षातून रेल्वेचे अधिकारी सर्व मालमत्तांची माहिती मुख्य नियंत्रण कक्षाला उपलब्ध करणार आहेत. मुख्य केंद्रातून सर्व माहिती इस्रोला पाठविण्यात येईल, जेथे संबंधित स्थानांची नोंद उपग्रहाच्या नियंत्रण यंत्रणेत केली जाणार आहे.

रेल्वेच्या सर्व मालमत्तांचा आराखडा तयार करण्यात आल्यानंतर जीआयएस पोर्टल विकसित केले जाईल. हे पोर्टल पूर्णपणे जीपीएस प्रणालीवर आधारित असणार आहे. या पोर्टलसाठी सध्या जोरदार काम सुरू आहे. सद्यकाळातील स्थिती पाहता डिसेंबर 2018 पर्यंत हे पोर्टल उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पोर्टलसाठी सीआरआयएस (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम्स) नव्या ऍप्लिकेशनची निर्मिती करत आहे. भारतीय रेल्वेने मालमत्तांची देखरेख यंत्रणा बळकट करण्याचे दिशानिर्देश दिले आहेत. मॅपिंगच्या हिशेबाने उपग्रहात चिन्हांकित स्थान अपलोड होईल. यामुळे 24 तास अशा स्थानांवर नजर ठेवली जाणार असून यात रेल्वेस्थानकांचा देखील समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)