आता रिलायन्सची JioHomeTV सेवा

मुंबई : दूरसंचार क्षेत्रात धुमाकूळ घातल्यानंतर रिलायन्स जिओ आता ब्रॉडबँड सर्व्हिस आणि डायरेक्ट टू होम सेवेवर काम करत आहे. याबाबत अनेक वृत्तही समोर आले आहेत. अशातच जिओ आता JioHomeTV ही नवी सेवा लाँच करणार असल्याचे वृत्त आहे.

TelecomTalk च्या वृत्तानुसार JioHomeTV मध्ये ग्राहकांना 200 एसडी (स्टँडर्ड डेफिनेशन) आणि एचडी (हाय डेफिनेशन) चॅनल मिळतील, ज्याची किंमत 400 रुपयांपासून सुरु होणार आहे. दरम्यान, JioHomeTV ही सेवा कंपनीची डीटीएच सेवा असेल की नवी सेवा आहे, हे कंपनीकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

शिवाय रिलायन्सने याबाबत अजून औपचारिक घोषणा केलेली नाही. JioHomeTV एक एनहेंस मल्टीमीडिया ब्रॉडकास्ट मल्टीकास्ट eMBMS सेवा असेल. येत्या काही आठवड्यातच ही सेवा ग्राहकांना मिळण्याची शक्यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)