आता राहिले 12 दिवस!

पिंपरी – पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीची धास्ती 15 दिवसात घालवू या.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनाचे विरोधकांनी शनिवारपासून (दि. 12) काउंट डाऊन सुरु केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरवासीयांनो शास्तीकर माफ होतोय, दिवस राहिले 12! असा काऊंट डाऊनचा फलक महापालिका भवनासमोर लावला आहे. उद्या (रविवारी) महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयासमोर मकाउंट डाऊनफचा फलक लावला जाणार आहे.

महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर काउंट डाऊनचा फलक लावताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे सचिन चिखले, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मानव कांबळे, नगरसेवक नाना काटे, नवनाथ जगताप, मयूर कलाटे, नगरसेविका वैशाली काळभोर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक गोरक्ष लोखंडे, विशाल वाकडकर, विशाल काळभोर, कविता खराडे, गंगा धेंडे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 9 जानेवारी) शहरातील अनधिकृत बांधकामांची शास्ती येत्या पंधरा दिवसात माफ करु, असे आश्नासन दिले होते. त्याचे विरोधकांनी काउंट डाऊन सुरु केले आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेला दिवस सोडून देण्यात आला आहे. त्यानुसार शास्तीकर माफीचा निर्णय घेण्यासाठी आजपासून केवळ 12 दिवस राहिले शिल्लक आहेत.

आज विरोधकांनी महापालिका प्रवेशद्वारासमोर फलक लावला. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे, अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मानव कांबळे यांची नावे आहेत. शास्तीकर माफ झालाच पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी आश्नासन पाळावे, खोटे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो, भाजप सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)