आता रणांगणातच लढत :सदाभाऊ खोत

खा. राजू शेट्टी यांच्याविरोधात लढण्याचे संकेत
सातारा, दि. 15 (प्रतिनिधी)-
तीव्र पाणी टंचाई असूनही ज्या गावांचा दुष्काळ यादीत समावेश झाला नाही, त्या गावांचा फेरसर्व्हे करण्याचे आदेश सहपालाकमंत्री ना. सदाभाऊ खोत यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक बांधावर जाऊन हे सर्व्हेक्षण करणार आहेत. व येत्या रविवार पर्यंत अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. आगामी लोकसभा निवडणूक माढा की हातकणंगले मतदारसंघातून लढणार ? या प्रश्नावर खोत यांनी आता रणांगणातच लढत देणार असे म्हणत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात लढण्याचे संकेत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दुष्काळी निवारण आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ज्या गावांत टॅंकरची मागणी आहे, त्या गावांना तात्काळ टॅंकर उपलब्ध करावा, चाऱ्याची व्यवस्था करावी, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. मायणी, निमसोड, कातरखटाव या ठिकाणी प्रचंड पाणी टंचाई असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच इतर काही गावांमध्येही परिस्थिती असू शकते. त्यामुळे प्रशासनाने सर्कलनिहाय सर्व्हे न करता तो गावनिहाय करावा, अशा सूचनाही केल्या असल्याचे मंत्री खोत म्हणाले. यवतमाळ जिल्ह्यातील अवनी वाघीनीची हत्त्या केल्याप्रकरणी प्राणीमित्र सरकारविरोधात तीव्र भूमिका घेऊन आहेत, याबाबत विचारले असता अवनी वाघीणीने तब्बल 13 जणांचा बळी घेतला होता. प्राण्यांइतकाच माणसाचा जीवही महत्त्वाचा आहे, प्राणी मित्रांनी हेही लक्षात घ्यावे, असे मंत्री खोत म्हणाले. ज्या कारखान्यांनी गतवर्षी ऊस नेल्यानंतर 14 दिवसांच्या आत एफआरपीची रक्कम दिली नाही, त्या कारखान्यांवर कायदेशीर कारवाई केली गेली नसल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. मात्र, या प्रश्नाला मंत्री खोत यांनी सोयीस्करपणे बगल दिली. हा विषय सहकार खात्याशी निगडीत असून त्यांना त्याबाबत सूचना केल्याचे मंत्री खोत यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणूक माढा की हातकणंगले मतदारसंघातून लढणार? या प्रश्नावर खोत यांनी आता रणांगणातच लढत देणार, असे म्हणत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात लढण्याचे संकेत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दुष्काळी निवारण आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)