आता येतोय “माय नेम इज रा गा’

देशात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्याचबरोबर मोठ्या पडद्यांवर म्हणजे चित्रपटसृष्टीमध्येही त्याचे परिणाम दिसून येत आहे. बॉलीवूडमध्ये सध्या राजकारणी नेत्यांवर एकापाठोपाठ एक चित्रपट तयार होत आहेत. पंतप्रधान मोदी याच्या “नमो’ चित्रपटाचे शुटींग सुरु झाले असताना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही आता चित्रपट येत आहे.

राहुल गांधी याच्या जीवनावर आधारित “माय नेम इज रा गा’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. पत्रकार आणि चित्रपट दिग्दर्शक रुपेश पॉल यांचा हा चित्रपट राहुल गांधी यांच्या बालपणापासून ते त्यांची कॉंग्रेस अध्यक्षपद निवड असा आवाका दाखवेल. या चित्रपटाचा टीझर नुकताच जारी करण्यात आला आहे.या चित्रपटाची सुरवात इंदिरा गांधी यांच्या हत्येपासून होणार आहे. सोनिया गांधी, प्रियांका, राजीव आणि राहुल यांच्या भूमिका यात असतील.

रुपेश या चित्रपट संदर्भात म्हणाले, राहुल गांधी यांचा महिमा वाढविणे हा या चित्रपटाचा हेतू नाही. राहुल यांना मी जवळून पहिले आहे. एखाद्या व्यक्तीवर सतत चौफेर हल्ले केले जात असतील आणि ती व्यक्ती त्याला धीराने तोंड देऊन यशस्वी बनली असेल अशा कुठल्याही व्यक्तीचा हा चित्रपट आहे. राहुल गांधी यांच्या वाट्याला हे सारे आले आहे तेच दाखविण्याचा प्रयत्न चित्रपटातून केला गेला आहे, असे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)