आता मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा पत्नीचा आरोप

कोलकाता:  भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्या अडचणी काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. कारण, त्याची पत्नी शमीवर एका नंतर एक आरोप करताना दिसत आहे. आता आणखी एक नवा आरोप तिने केला आहे. शमीची पत्नी हसीनने पुन्हा गंभीर आरोप करत भारतीय क्रिकेट संघात खेळण्यासाठी शमीने त्याच्या वयाचे बनावट प्रमाणपत्र सादर केले होते. शमीने त्याचे वय लपवून सगळ्यांनाच मूर्ख बनवले, असल्याचे तिने म्हटले आहे.

हसीनने फेसबुक पोस्टमध्ये शमीच्या ड्रायव्हिंग लायसन्सचा फोटोही शेअर केला आहे. त्यावर शमीची जन्मतारीख ०३/०५/१९८२ आहे. तर बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाइटवर शमीच्या प्रोफाइलमध्ये जन्मतारीख ०३/०५/१९९० अशी आहे. शमीने वय लपवून बीसीसीआय आणि बंगाल क्रिकेट संघाला मूर्ख बनवले, असे हसीनने पोस्टमध्ये म्हटले आहे. १९९० हे जन्मवर्ष असल्याचे सांगून शमीने सगळ्यांनाच फसवले आहे. खरे वय लपवून शमी २२ वर्षांखालील क्रिकेट संघात खेळला. असे करून शमीने एका २२ वर्षीय तरुणाची फसवणूक केली आहे. शमीच्या जागी एखाद्या तरुणाला संधी मिळू शकली असती, असेही ती म्हणाली. याआधी तिने शमीविरोधात घरगुती हिंसाचार, लग्नानंतर प्रेमसंबंध आणि मॅच फिक्सिंगचा आरोप केला होता.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)