आता मोदींना पत्र लिहून चौकात बोलावावे – राज ठाकरे

बीड – नोटाबंदीचा निर्णय फसला तर मला भर चौकात शिक्षा द्या, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. आता नोटाबंदी फसली आहे. त्यामुळे लोकांनी मोदींना पत्र लिहून चौकात बोलावले पाहिजे, असे टीकास्त्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोडले. मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी बीडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.

औरंगाबादनंतर त्यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला. रुपयाच्या अवमूल्यनावरुनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. रुपयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे अवमूल्यन झाले आहे, असे राज म्हणाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा अट्टहास राजस्थान हातचे जात आहे, हे लक्षात आल्याने होत आहे. आपला पराभव झाकण्यासाठी ही खेळी सुरु आहे. भाजपाकडे पैसे अधिक आहेत, म्हणून सारख्या निवडणुका घ्यायचा का? असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमध्ये गेले आहेत, कारण तिकडे थापा आहेत, अशी कोपरखळी त्यांनी लगावली.

ईव्हीएम नको म्हणून मी सर्व राजकीय पक्षांना पत्र लिहिले आहे. प्रत्यक्ष भेट केवळ शरद पवार यांची घेतली, असे राज यांनी सांगितले. तरुणांचा ओढा शहराकडे आहे. शेतीच्या दुरवस्थेमुळे तरुणांना शेती करावीशी वाटत नाही, असे राज ठाकरे यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)