नवी दिल्ली- आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून देशातील नागरिकांशी संवाद साधला. आज मन की बातच्या सुरवातीलाच नरेंद्र मोदी यांनी, जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ही पंतप्रधानांची सरत्या वर्षातील शेवटची ‘मन की बात’ आहे. पंतप्रधान आज काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होत.
दरम्यान आज आपल्या मन की बातमधून पंतप्रधानांनी भ्रष्ट्राचारमुक्त भारत, जातीयवादमुक्त भारत, याची आवश्यकता स्पष्ट करतानाच आणखी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. आता मुस्लिम धर्मातील महिलांना कुठल्याही पुरुष साथीदारांशिवाय हज यात्रेला एकट जाता येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
पुरूष साथीदाराविना महिलांना हज यात्रेवर जाण्यास परवानगी नाही, पण हा भेदभाव आणि अन्याय सरकारने संपवल्याचे मोदींनी जाहीर केले. आता मुस्लिम महिला या पुरूष सहकाऱ्याविना हज यात्रेवर जाऊ शकतील, असे म्हटले. केंद्र सरकारने पहिल्यांदाच विना मेहरम किमान चार लोकांच्या समूहात ४५ वर्षांहून अधिक वयाच्या महिलांना हज यात्रेवर जाण्यास मंजुरी दिली. ज्या पुरूषाचा एखाद्या महिलेशी विवाह होऊ शकत नाही जसे की, वडील, भाऊ आणि मुलगा त्यांना मेहरम म्हटले जाते. आतापर्यंत महिला यात्रेकरूबरोबर मेहरमची आवश्यकता असायची.
मोदी म्हणाले, नुकतेच मला समजले की, जर एखाद्या मुस्लिम महिलेला हज यात्रेला जायचे असेल तर ती पुरूष सदस्याशिवाय जाऊ शकत नाही. हा भेदभाव पाहून मी आश्चर्य चकित झालो. पण आता त्या एकट्याने हज यात्रेवर जाऊ शकतील. आम्ही हा नियम बदलला असून यावर्षी १३०० मुस्लिम महिलांनी पुरूष सदस्याविना हज यात्रेला जाण्यासाठी अर्ज केला असून, त्याला केंद्र सरकार परवानगी देणार असल्याचे मोदींनी म्हंटले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा