आता मुंबई विद्यापीठाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव

मुंबई – सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद सुरू असताना आता मुंबई विद्यापीठाचे नाव बदलण्याची मागणी करण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठाचे नाव राजमाता जिजाऊ भोसले मुंबई विद्यापीठ करावे, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेत सादर करण्यात आला आहे.

याबाबतचा प्रस्ताव शिवसेना नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी मांडला आहे. या प्रस्तावाला सर्वपक्षीय सहमती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, सध्या सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद चर्चेत आहे. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र हा वाद उच्च न्यायालयात गेल्यानंतर नामांतर लांबणीवर पडले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोलापूर विद्यापीठाच्या नामकरणाला शिवा-अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेसह अन्य काहींनी जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले होते. त्यावर कोणताही निर्णय झालेला नसताना राज्य सरकार असा निर्णय घेऊ शकत नाही, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)