आता माझी सटकली….

डोर्लेवाडी- बारामती तालुक्‍यातील झारगडवाडी येथे अनेक वर्षांपासून अवैध धंदे करणाऱ्यांकडून पोलीस आणि शासकीय अधिकाऱ्यांनाच कोलदांडा दाखविला जात असल्याबाबतचे वृत्त दैनिक प्रभातने प्रसिद्ध केले होते. शासकीय अधिकाऱ्यांचा काही वचक राहिला आहे का? असा थेट सवाल करण्यात आल्यानंतरही या भागातील अवैध धंदे बंद होत नव्हते. अखेर याची गंभीर दखल घेतम आता माझी सटकली… नुसार प्रांताधिकारी हेमंत निकम, पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांनी झारगडवाडीतील अवैध धंदे उखडून टाकण्याबाबत कडक आदेश दिले.
बारामती, इंदापूर तालुक्‍यात राजरोजपणे सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी आम्ही पाऊल उचलले आहे. बारामती तालुक्‍यातील झारगडवाडी गावामध्ये अवैध धंदे येणाऱ्या काळात कायमस्वरूपी बंद करणार असून प्रशासन व ग्रामपंचायतीच्या मदतीने अवैध धंदे करणाऱ्याचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कारवाई सुरू केली आहे. जोपर्यंत अवैध धंदे कायमस्वरूपी बंद होत नाहीत तोपर्यंत कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी सांगितले.
वरिष्ठांकडून असे आदेश आल्याने राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम सहाय्य निरीक्षक ऐ. जे. बिराजदार, डी. एम. पाटील, सहाय्य निरीक्षक ओमासे डी. एस, भानुदास बंडगर, पोलीस नाईक अनिल खेडकर, पोलीस हवालदार भाऊसाहेब पलंगे यांनी गावात येऊन अनेक ठिकाणी दारू अड्यावर कारवाई केली.
यावेळी तीन हजार सहाशे रुपयांची देशी दारू, रसायन नष्ट करण्यात आले. आज, केलेल्या कारवाई मध्ये दारू भट्टीवर जाऊन तेथे देशी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य देखील नष्ट करण्यात आले त्यात तीन मोठे बॅरेल, छोटे ड्रम फोडण्यात आले. ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)