आता मलेशियामध्येही ‘पद्मावत’च्या प्रदर्शनावर बंदी

नवी दिल्ली: प्रचंड वादविवादानंतर अखेर संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत सिनेमा भारतात रिलीज झाला. भारतात जरी ‘पद्मावत’च्या रिलीजचा मार्ग मोकळा झाला असला तरीही मलेशियामध्ये पद्मावतच्या रिलीजवर बंदी घालण्यात आली आहे.  राजपूतांचा अपमान करणारा सिनेमा असल्याचा आरोप करत भारतात करणी सेनेने पद्मावतविरोधात तीव्र-हिंसक आंदोलने  केली होती. तर दुसरीकडे, मलेशियामध्ये ‘इस्लामिक धर्मियांच्या भावना’ लक्षात घेत पद्मावतवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मलेशियाच्या नॅशनल फिल्म सेन्सॉरशिप बोर्डनं देशात संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावतच्या रिलीजवर बंदी आणली आहे. ज्या पद्धतीनं सिनेमामध्ये अलाउद्दीन खिलजीची व्यक्तीरेखा सिनेमामध्ये दाखवण्यात आली आहे, त्यानुसार मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुस्लिम बहुल देश मलेशियामध्ये सिनेमातील कथा चिंतेचा विषय आहे, असे मलेशियाच्या नॅशनल फिल्म सेन्सॉरशिप बोर्डचे अध्यक्ष मोहम्मद जाम्बेरी अब्दुल अजीज यांनी सांगितले. अजीज यांनी पुढे असेही म्हटले की, सिनेमातील कथेमुळे मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि ही बाब मलेशियासारख्या मुस्लिम बहुल देशासाठी चिंतेचा विषय आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)