आता भारतीय सीमेवरील जवान होणार आधुनिक शस्त्रधारी

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने चीन आणि  पाकिस्तान यांच्या सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांसाठी आधुनिक शस्त्रे देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी आधुनिक रायफल्स, लाइट मशीन गन आणि क्लोजक्वार्टर बॅटल कार्बाइन्स उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. जलदगती प्रक्रियेतंर्गत ही शस्त्रास्त्रे पुरवली जाणार आहेत.

दहा दिवसांच्या आत हा करार निश्चित केला जाणार आहे. येत्या वर्षभरात ही शस्त्रास्त्रे भारताला सोपवली जातील अशी अपेक्षा केली जात आहे. सन 2005 मध्येच लष्कराने 382 बटालियन्ससाठी सीक्मयूबी कार्बाइन्सची मागणी केली होती. याच्या प्रत्येकात 850 सैनिक आहेत. सन 2009 मध्येच लाइट मशीन गनचे प्रकरण सुरू झाले होते. पण काही तांत्रिक मापदंडामुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)