आता बॅंड वाजणार सुशीलकुमारांचे वक्तव्य

सोलापूर – महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे आता बॅंड वाजणार असल्याचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. पुढील महिन्यात निवडणुका पार पडणार आहेत. मात्र असे असले तरीही अद्याप कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच भाजपा, शिवसेना या पक्षांमध्ये आघाडी वा युतीचा निर्णय झालेला नाही. हे पक्ष स्वतंत्ररित्या निवडणूक लढणार की एकत्रितपणे, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे.

आघाडीबाबत प्रदेश कॉंग्रेस कमिटी निर्णय घेणार, तरीही मतांची विभागणी होऊ नये म्हणून आघाडी होणे महत्वाचे आहे, असे मत अनेकांनी मांडल्याचे त्यांनी नमूद केले. भाजप – शिवसेना हे पारंपरिक विरोधी पक्ष आहेत, मात्र आता नव्याने काही पक्ष आणि विरोधक तयार झाले आहेत. त्यांच्यात मताचे विभाजन होऊ नये यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)