आता फ्रीडा पिंटोही अडकणार विवाह बंधनात? 

अनेक महिन्यांपासून चर्चा असलेल्या दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचा शाही सोहळा नुकताच पार पडला. एका दिवसापूर्वीच बंगळूरू येथे झालेल्या रिसेप्शन पार्टीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता चाहत्यांना प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स यांच्या लग्नाची उत्सुकता आहेत. त्यातच आता फ्रीडा पिंटोही लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बॉलीवडूमध्ये फ्रीडा पिंटोने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. “स्मलडॉग मिलेनियर’ चित्रपटातून तिला जगभर प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने हॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. ती आता लवकरच लग्न करणार आहे.

फ्रीडा ही आपला बॉयफ्रेंड कोरी ट्रॅन यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असून हे दोघे लग्न करणार असल्याचे समजते. हे कपल एकमेकांबाबत खूपच सीरियस असून कोरीने फ्रीडाला प्रपोज देखील केलेले आहे. हे दोघे एका वर्षापासून लग्न करण्याच्या विचारात आहेत. फ्रीडा आपली पर्सनल लाईफ शक्‍यतो शेअर करत नाही. पण तिने आपली रिलेशनशिप्स कधीही लपवून ठेवली नाही. मात्र, या लग्नाबाबत दोघांनी अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. दरम्यान, फ्रीडा पिंटोचा “लव सोनिया’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. सध्या ती आगामी “मोगली ः लेजेंड ऑफ द जंगल’ चित्रपटात व्यस्त आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)