आता फक्‍त घरचे नाही तर बाहेरचेपण शेर!!

भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात मालिका विजय मिळवत इतिहास घडवला भारताने ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिल्यांदाच मालिका विजय मिळवत ‘विराट’ कामगिरी केली. गेल्या 71 वर्षात भारताला जी कामगिरी पार पाडता आली नव्हती ती कामगिरी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने केली आहे. भारताच्या या विराट कामगिरीचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे कारण भारतीय संघाला नेहमीच घर का शेर असे हिणवले जायचे. अर्थात त्यात तथ्यही होते कारण मायदेशात दादा असणारा भारतीय संघ परदेशात मात्र सातत्याने पराभवाचा सामना करीत होता.

आपल्यावरील ‘घर के शेर’चा शिक्‍का पुसण्याच्या इराद्याने यावेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने जिद्दीने खेळ करीत ऑस्ट्रेलियाला सर्वच आघाड्यांवर पाणी पाजत विजय संपादित केला. भारतीय संघाच्या या अभूतपूर्व कामगिरीनंतर देखील काही नतद्रष्ट टीकाकारांनी ‘ऑस्ट्रेलियन संघ कुमकुवत होता म्हणून भारताला विजय मिळाला,’ असे म्हणत भारताच्या विजयाचे श्रेय हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु अशा टीकाकारांनी ऑस्ट्रेलियाचा संघ कुमकुवत आहे यात भारतीय संघाचा काय दोष? या साध्या प्रश्‍नाचे उत्तर देऊन आपला युक्‍तिवाद सिद्ध करावा. भारतीय संघावर टीका करणाऱ्या टीकाकारांनी भारतीय संघाची या मालिकेतील कामगिरी पहावी फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडीवर भारतीय संघाने वर्चस्व गाजवले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने देखील या मालिकेत आपल्या नेतृत्व गुणांची झलक पुन्हा एकदा क्रिकेटविश्‍वाला दाखवली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय संघाची या मालिकेतील कामगिरी पाहता हा संघ परदेशात जास्तीतजास्त विजय मिळवित क्रिकेट विश्‍वावर एकछत्री अंमल करेल असा विश्‍वास वाटतो विराट कोहलीच्या नेतृत्वाखालीला हा संघ विश्‍वविजयी ठरेल यात शंका नाही ऑस्ट्रेलियन भूमीवर विजय मिळवीत इतिहास घडवणाऱ्या भारतीय संघाचे मनापासून अभिनंदन!

– श्‍याम बसप्पा ठाणेदार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)