आता पॅनकार्डवर वडिलांचे नाव अनिवार्य नाही 

नवी दिल्ली – “पॅन’ कार्डसाठीच्या अर्जावर वडिलांचे नाव नमूद करणे अनिवार्य असणार नाही, असे प्राप्तीकर विभागाने म्हटले आहे. ज्या अर्जदारांच्या माता एकट्या असतील त्यांच्यासाठी ही सवलत असणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने एका अधिसूचनेद्वारे प्राप्तीकर नियमामध्ये ही दुरुस्ती केली आहे. या दुरुस्तीद्वारे अर्जदाराला पॅनकार्डच्या अर्जामध्ये एक पर्याय दिला जाणार आहे.

माता “एकच पालक’ असल्यास आणि अर्जदार व्यक्‍तीला पालक म्हणून केवळ आईचेच नाव लिहायचे असल्यास वडिलांचे नाव लिहीण्याची सक्‍ती असणार नाही. सध्या “पॅन’ कार्डच्या अर्जावर वडिलांचे नाव लिहीणे अनिवार्य आहे. मात्र आता या संदर्भातील नवीन नियम 5 डिसेंबरपासून लागू होणार आहे.

-Ads-

या अधिसूचनेद्वारे कर विभागाने “एकच पालक’ असलेल्या मातांच्या अपत्यांची अडचण दूर केली आहे. ज्या व्यक्‍तींनी एकाच आर्थिक वर्षात 2.5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक व्यवहार केले आहेत, त्यांनी “पॅन कार्ड’साठी अर्ज करणे अनिवार्य करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)