आता पूर्ण व्यावसायिक सिनेमे करायचे आहेत- रसिका दुग्गल

रसिका दुग्गल बहुतेकवेळा अशा सिनेमांमध्ये दिसते, ज्याची कथा खूपच दमदार असते. त्याशिवाय नेहमी स्वतंत्र पठडीतल्या सिनेमांमध्ये काम करण्यास तिने प्राधान्य दिले आहे. ज्या सिनेमांना व्यवसायिकदृष्ट्याही महत्त्व असेल अशा सिनेमांमध्येही तिला आता काम करायचे आहे. प्रेक्षकांना आवडणारा ट्रेन्ड म्हणजे कॉमेडी. त्यामुळे कॉमिक सिनेमांमधील रोल मिळाले तर तिला जास्त आनंद होणार आहे.

कॉमेडी करण्याच्या अपेक्षेमागचे खरे कारण म्हणजे आपला स्वतःचा स्वभावच कॉमिक आहे, असे तिला वाटते. त्यामुळे जे सिनेमे करताना अधिक आनंद होईल, अशा सिनेमांना आता तिला प्राधान्य द्यायचे आहे. तिने थिएटरमध्येही कॉमिक रोल पूर्वी केले आहेत. ते करताना तिला जो आनंद आला त्याचा पुन्हा एकदा तिला अनुभव घ्यायचा आहे. त्यातही जागतिक पातळीवर ज्या सिनेमांची ओळख निर्माण होईल, अशा सिनेमांचीही तिला अपेक्षा आहे. “मंटो’मुळे रसिकाला खूप मोठे ग्लॅमर मिळाले. तिच्या अभिनयाचे कौतुकही झाले. पण गेल्यावर्षी तिने “सो बेसिकली धीस इज ऍक्‍टर लाईफ : रसिका दुग्गल’ नावाच्या एका सिनेमातही कॉमिक रोल केला होता. पण त्या सिनेमाची बॉक्‍स ऑफिसवर विशेष गणना झाली नव्हती. रसिकाने आतापर्यंत व्यावसायिक सिनेमांमध्ये विशेष काम केलेले नाही. अशा फुल्ल टू एन्टरटेनमेंट करणाऱ्या मेनस्ट्रीम सिनेमांसाठी तिला अनेक ऑफरही आल्या होत्या. पण त्यावेळी तिला अशा सिनेमांमध्ये रस वाटला नाही. त्यातही तिचे रोल खूपच छोटे होते. म्हणून तिने हे सिनेमे स्वीकारले नाहीत. मात्र त्याचा तिला मुळीच पश्‍चाताप नाही. पण अशा सिनेमांचे तिला खूप आकर्षण आहे.

हिंदीबरोबर मल्याळम आणि काही वेबसिरीजही तिने केल्या. रसिकाचे “किस्सा’ आणि “क्षय’ सारख्या सिनेमांना समिक्षकांनी गौरवलेही होते. मात्र राजीव रवी या दिग्दर्शकाने “कामतीपदम’मधील मोठे सीन डिलीट केले. म्हणून तिने हा सिनेमाच न बघण्याचा निर्णय घेतला. दक्षिणात्य सिनेमांमध्ये विशेष आनंद जरी मिळाला नसला तरी तिला प्रादेशिक सिनेमांमध्येही काम करायचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)