आता नाट्यगृहांचे बुकींग ऑनलाईन

पिंपरी – महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये कार्यक्रमाच्या बुकींगबाबत सुरु असलेल्या अनागोंदी कारभाराची अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दखल घेतली आहे. यापुढे ऑनलाईन पद्धतीने बुकींग देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

नाट्यगृहांच्या नोंदणी संदर्भातील तक्रारींच्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. दोन तास चाललेल्या या बैठकीत दिलीप गावडे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. चिंचवडचे रामकृष्ण मोरे नाट्यगृह, सांगवीतील निळूभाऊ फुले नाट्यगृह, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे नाट्यगृह आणि भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह अशी महापालिकेची चार नाट्यगृहे आहेत. या ठिकाणी असणाऱ्या समस्या व तक्रारींचा आढावा घेण्यासाठी पालिका मुख्यालयात बैठक झाली. गावडे यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी आशादेवी दुर्गुडे, श्रीनिवास दांगट, आशा राऊत यांच्यासह विविध अभियंते, सहायक आरोग्य अधिकारी, सर्व नाट्यगृहांचे व्यवस्थापक आदी उपस्थित होते.

-Ads-

नाट्यगृहांमधील अस्वच्छता, सदोष ध्वनिक्षेपक यंत्रणा, सतत बिघडणारी वातानुकूलित यंत्रणा, तारखा वाटपांचा घोळ, वाहनतळ, उपाहारगृह आदींविषयी सविस्तर चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी तसेच नाट्यगृह व्यवस्थापकांनी सर्व काही आलबेल असल्याची माहिती बैठकीत सादर केली. तथापि, गावडे यांनी सविस्तर चर्चा करत तक्रारी असणाऱ्या मुद्यांवरून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. सर्वाधिक तक्रारी विद्युत विभागाशी संबंधित होत्या. यापुढे कोणतीही तक्रार येता कामा नये, असे विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना बजावण्यात आले. अपूर्ण असलेली सर्व कामे तातडीने मार्गी लावावीत, नाट्यगृहांच्या वरच्या भागात सौरऊर्जा बसवण्यात यावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)