आता नागपूरबाहेरही मेट्रो धावणार…

वर्धा-भंडारा-रामटेकचा प्रस्तावास रेल्वेची तत्वत: मंजुरी
नवी दिल्ली – नागपुरातील मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात पोहचत नाही तोच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भंडारा आणि वर्धा येथे ट्रांझिट मेट्रो चालविण्याची तयारी सुरू केली आहे.

रेल्वे मंत्रालयातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, नागपूरहून भंडारा, वर्धा आणि रामटेक यासाठी पॅसेंजर गाडी चालविली जाते. आता पॅसेंजरऐवजी चार डब्यांची मेट्रो सुरू करण्याचा प्रस्ताव नागपूर मेट्रोने रेल्वे मंत्रालयाला दिला आहे. राष्ट्रीय महामार्ग, जहाजबांधणी, जल संसाधन आणि गंगा पुनरूध्दार मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर रेल्वे मंत्रालयाने या प्रस्तावाला तत्वतः मंजुरी दिली असल्याचे सूत्राने सांगितले.

-Ads-

रेल्वे मंत्रालयातील उच्चस्तरीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील हेवीवेट मंत्री नितीन गडकरी आता नागपूर उपनगरात मेट्रो चालविण्याच्या कामाला लागले आहेत. चार डब्यांची मेट्रो ताशी शंभरच्या स्पीडने चालविली जाणार आहे. ही मेट्रो ब्रॉडगेज मार्गावर चालविली जाणार आहे. शिवाय, सगळा खर्च नागपूर मेट्रो करणार आहे. यामुळे रेल्वे खात्याने कां-कूं न करता या प्रस्तावाला लगेच मंजुरी दिली. याशिवाय मेट्रो डब्यांची निर्मिती सुध्दा नागपुरात करण्याचा विचार आहे. नागपूर मेट्रो आणि रेल्वे मंत्रालयामध्ये लवकरच यासाठी करार केला जाणार आहे.

पॅसेंजरची वेळ अनिश्‍चित असते. वेळेवर सुटली तर मधात कुठे थांबेल आणि किती काळ थांबेल याचा थांगपत्ता नसतो. यामुळे भाजीपाला, फळे, दूध, मासे आदी वस्तू खराब होतात. मेट्रो पूर्णतः वातावणुकीत असते. यामुळे फळभाज्या खराब होणार नाही आणि शेतकऱ्याला आपल्या वस्तू वेळेत शहरात नेता येईल.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)