आता दुधाचे पैसे मिळणार कमी

राज्य शासनाने घातल्या अटी : दूध उत्पादकांची मागणी फेटाळली

पुणे – दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर 25 रूपये दर देण्याचा निर्णय जाहीर करणाऱ्या राज्य शासनाने आता अटी व शर्थी लागू केल्या आहेत. त्यामुळे शर्थी पूर्ण करणाऱ्या दूध उत्पादकाला हा दर मिळणार असल्याने पुन्हा एकदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचे पैसे कमी मिळणार आहेत. दूध खरेदी करताना कुठलीही शर्थ नसावी, अशी दूध उत्पादकांची असणारी मागणी फेटाळण्यात आली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलिटर 25 रूपये दर देण्याचे निश्‍चित केले होते. 1 ऑगस्टपासून त्याची अमंलबजावणीसुद्धा सुरू झाली आहे. मात्र, महिनाभराच्या आताच राज्य शासनाने यु-टर्न घेत 25 रूपये दर देण्यासाठी दूध उत्पादकांना अटी व शर्थी लागू केल्या आहे. त्यात एसएनएफचे (सॉलिडस्‌ नॉट फॅट) प्रमाण कमी असलेल्या गायीच्या दूध खरेदी दरात 1 रूपये कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना 1 रूपये कमी दर मिळणार आहे. याबाबत राज्य शासनाने नुकतीच अधिसूचना जारी करून नवीन दर घोषित केले आहेत.

3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफला असलेल्या दुधाला 25 रूपये प्रतिलिटर खरेदी दर आहे. सरकारने एसएनएफच्या खरेदी दरात प्रतिपॉइंट कमी फॅटसाठी 30 पैशांची कपात मान्य केली होती. पण, प्रतिपॉइंट कमी एसएनएफकरिता दर कपातीबाबत सरकारने कोणताही उल्लेख सरकारी आदेशात केला नव्हता. राज्यातील सहकारी व खासगी संस्थांनी एसएनएफमधील कपात अवघी 30 पैसे असल्याचे निदर्शनास आणले. उच्च प्रतीचे दूध स्वीकारताना तसेच भेसळीला आळा बसावा, यासाठी फॅटबरोबर एसएनएफसाठी प्रतिपॉइंट काही रक्‍कम कपात करण्याची आवश्‍यकता आहे, अशी मागणी केली.

फॅट चांगले असले तरी, एसएनएफमध्ये अन्य आवश्‍यक असलेले घटक कमी असतात. त्यामुळे दुधाचा दर्जा घसरतो, असे दूध संघांचे म्हणणे आहे. सरकारने सहकारी व खासगी दूध संस्थांनी मागणी करत दुधाच्या प्रतिपॉइंट एसएनएफकरिता 1 रूपये कपातीचा निर्णय घेतला. त्यामुळे 8.3 आणि 8.4 एसएनएफ असलेल्या खरेदी दरात एक रूपयाने कपात होणार आहे. यापूर्वी फॅटनुसार दर मिळत होता. मात्र, आता एसएनएफची अट घातली असल्याने खरेदी दर कमी होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)