आता दिल्लीमध्ये दिसणार पर्यटकांना जगातील सात आश्चर्य

दिल्ली – राजधानी दिल्ली येथे हजरत निजामुद्दीन मेट्रो स्टेशनजवळील दक्षिण दिल्ली महानगरपालिकेने तयार केलेल्या जगातील सात आश्चर्य पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. मिलेनियम पार्कमध्ये जगाच्या सात आश्चर्यकारक कलाकृती तयार केल्या आहेत. विशेष म्हणजे या जगातील सात आश्चर्यांना कॉरपोरेशनच्या स्टोअर रूममध्ये ठेवलेल्या  स्ट्रीट लाइट खांब, नट-बोल्ट अन्य टाकाऊ वस्तूंच्या साहाय्याने तयार केले गेले आहे.

याबाबत दक्षिण दिल्ली महानगरपालिकेचे आयुक्त पुनित कुमार गोयल म्हणाले की, ”या प्रकल्पास पूर्ण करण्यासाठी 19 कोटींचा खर्च लागणार होता, मात्र उद्यान बनवण्यासाठी कॉरपोरेशनच्या स्टोअर रूममधील टाकाऊ वस्तूंचा वापर केला गेला यामुळे ७.५ कोटी या खर्चात उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. हे उद्यान दिल्लीतील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक असेल. यासाठी प्रत्येक व्यक्तीस १०० रुपयांपेक्षा अधिक पैसे आकारले जाऊ शकतात.”

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)