आता दर महिन्याला होणार एटीएमच्या कॅशची मागणी, सप्लायची चौकशी

नवी दिल्ली : एटीएममध्ये रोख रकमेचा तुटवडा असल्याने केंद्र सरकारवर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. दरम्यान, या परीस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेच पुढाकार घेतला आहे. यापुढे सर्व प्रादेशिक कार्यलयातून दर महिन्याला एटीएममधून कॅशची मागणी व सप्लायची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

फायनान्शिअल इंटेलिजन्स यूनिट (एफआययू) जवळपास 2166 एटीएम सेंटरची तपासणी करणार आहे. गेल्या काही दिवसात जास्त पैसे काढलेले हे एटीएम आहेत. त्यांचीच आता तपासणी केली जाणार आहे. तसेच ज्या लोकांनी या एटीएममधून जास्त पैसे काढले,त्यांचीशी माहिती घेतली जाणार आहे.  या तपासत आयकर विभागही एफआययूची मदत करणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)