आता थेट प्लॅस्टिक उत्पादकांवर कारवाई

बंदी आदेश अंमलबजावणी : विक्रेते, साठेबाजही रडारवर

पुणे – राज्य शासनाने घेतलेल्या प्लॅस्टिकबंदी निर्णयानंतर मुंबई उच्च न्यायालयाने 23 जूनपर्यंत कारवाई न करण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थाना दिल्या होत्या. ही मुदत संपत आल्याने महापालिकेने प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याची सुरूवात प्लॅस्टिक उत्पादकांवर कारवाई करून केली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली.

उत्पादकांवर कारवाई केल्यानंतर पुढील टप्प्यात विक्रेते, साठा करणारे आणि नंतर नागरिकांना कारवाईला समोरे जावे लागणार आहे. राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून संपूर्ण राज्यात प्लॅस्टिक आणि थर्मोकोलवर बंदी जाहीर केली. त्याविरोधात, प्लॅस्टिक उत्पादक-विक्रेते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने सरकारच्या आदेशाला स्थगिती देण्यास स्पष्ट नकार देताना, केवळ आस्तित्वातील प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी एकऐवजी तीन महिन्यांची मुदत दिली. ही मुदत 23 जूनला संपणार आहे. त्यानंतरही प्लॅस्टिकचे उत्पादन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निंबाळकर यांनी दिले.

प्लॅस्टिकच्या निर्मितीवर सरकारने बंदी घातली असल्याने आदेश डावलून प्लॅस्टिक-थर्मोकोलचे उत्पादन करणाऱ्यांवर सर्वप्रथम कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यापुढील टप्प्यात संबंधित वस्तूंचा साठा आणि विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवरही कारवाई केली जाणार आहे. उत्पादक आणि विक्रेत्यांसह प्लॅस्टिकचा वापर करण्यावरही बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे, प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या नागरिकांवरही भविष्यात कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)