आता तेजस्वी यादवही बिहारमध्ये काढणार यात्रा

पाटणा – राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव 10 फेब्रुवारीपासून राज्यव्यापी न्याय यात्रा काढणार आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यापाठोपाठ तेजस्वी यांचीही यात्रा होणार असल्याने बिहारमधील वातावरण ढवळून निघणार आहे.

तेजस्वी यांच्या यात्रेवेळी नितीश आणि त्यांच्या सरकारवर निशाणा साधला जाणार आहे. काही महिन्यांपूर्वी नितीश यांनी राजीनामास्त्र उगारल्याने बिहारमधील जेडीयू, राजद, कॉंग्रेस महाआघाडीची सत्ता संपुष्टात आली. त्यानंतर नितीश यांनी भाजपशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केले. तेव्हापासून राजदने नितीश यांनी जनमताचा अनादर केल्याची टीका लावून धरली आहे. तोच मुद्दा तेजस्वी यांच्या यात्रेच्या केंद्रस्थानी असेल, असे सूतोवाच राजदने केले आहे.

-Ads-

नितीश सरकारमधील कथित भ्रष्टाचार, राज्यातील विकासाची ठप्प झालेली प्रक्रिया आणि गुन्हेगारीचा वाढता आलेख हे मुद्दे घेऊन तेजस्वी जनतेसमोर जाणार आहेत. दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी प्रस्तावित यात्रेवरून तेजस्वी यांची खिल्ली उडवली आहे. यात्रेवेळी तेजस्वी यांनी चारा घोटाळ्याबद्दल जनतेची माफी मागावी, असे त्यांनी म्हटले आहे. चारा घोटाळ्याशी संबंधित तीन प्रकरणांत लालूंना दोषी ठरवण्यात आले आहे. त्याचा संदर्भ सुशील यांनी दिला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)