आता ठराविक वेळेतच खरेदी करता येणार टोमॅटो

नारायणगाव- जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रात टोमॅटो खरेदीसाठी व्यापाऱ्यांना सकाळी 9 ते दुपारी 3 ही वेळ निश्‍चित करण्यात आली आहे. या वेळेत बाजार समितीच्या आवारात येणाऱ्या गाड्यांमध्ये टोमॅटोची खरेदी-विक्री होईल. सकाळी व संध्याकाळी खरेदी चालू असताना दरामध्ये 10 टक्क्‌यापेक्षा जास्त कपात नसावी, तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे 24 तासात देण्याचे बंधन व्यापाऱ्यांना राहणार आहे, असे महत्वपूर्ण निर्णय नारायणगाव उपबाजार केंद्राच्या बैठकीत घेण्यात आले, अशी माहिती सभापती ऍड. संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली आहे.
नारायणगाव उपबाजार केंद्रात टोमॅटो उत्पादक शेतकरी व व्यापारी यांच्यातील अडीअडचणी सोडविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये समन्वयाने हे निर्णय घेण्यात आले. यावेळी संचालक रंगनाथ घोलप, संतोष तांबे, ऍड. निवृत्ती काळे, आनंद रासकर, नासिर मनियार, योगेश शेटे, प्रकाश ताजणे, हिराबाई चव्हाण, सुमन बोऱ्हाडे, सचिव सी. डी. रूकारी, उपसचिव शरद धोंगडे, शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, नामदेव बोऱ्हाडे, रोहिदास भोर, सतिश पाटे, सर्व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दगडू पवार, रोहकडी येथील बचत गट, प्रगत टोमॅटो शेतकरी बचत गट, भगवान घोलप, निलेश घोलप, शेतकरी बचत गटचे राजू घोलप, उत्कर्ष शेतकरी बचत गटाचे भाऊसाहेब मुराबे यांच्यासह व्यापारी व शेतकरी उपस्थित होते.
बैठकीत व्यापारी व शेतकरी यांच्या वतीने बाजारभाव स्थिर ठेवण्यासाठी सर्वानुमते सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत माल प्रतवारीनुसार विक्रीसाठी आणावा. तसेच सदर निर्णयाची अंमलबजावणी 15 जुलै पासून करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांचे पेमेंट वेळेत करावे लागणार आहे. शेतकऱ्यांनी 22 किलोचा टोमॅटो क्रेट विक्रीसाठी आणताना तो वजन करून आणावा तसेच मालाची प्रतवारी करून आणण्याचे बंधन करण्यात आले आहे. माल उपबाजार केंद्रात विक्रीसाठी आणल्यानंतर शेतकऱ्यांना पट्टी देण्यात यावी, असे निश्‍चित करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)